30+Sai Baba Quotes In Marathi: साईबाबांचे प्रेरणादायी विचार मराठीत

साई बाबा कोट्स इन मराठी केवळ मनाला शांतता देत नाहीत, तर आत्म्याला साई मार्गावर चालण्याची प्रेरणाही देतात. या विचारांमध्ये श्रद्धा, सबुरी, भक्ती आणि सेवेचा अद्भुत संदेश दडलेला आहे. Sai Baba Quotes In Marathi हे भक्तिभाव अधिक खोलवर समजून घेण्याचे माध्यम आहेत.

30+Sai Baba Quotes In Marathi

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे

साई माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दे,
आयुष्यात कितीही संकटे आलीत तरी हरकत नाही पण तुझाच हात माझ्या हाती दे
ॐ साई राम

एक आस… एक विसावा,
साई तुझा चेहरा रोज दिसावा।
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा।
ॐ साई राम

माझं मन मोकळं करण्यासाठी घरात जसे माझे बाबा,
तसेच माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारे साईबाबा।
ओम साईराम

शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई,
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई.
ॐ साई राम

जगण्याच्या व्यापात रडणाऱ्यालाही हसवतात तुम्ही बाबा,
रडण्यातुनही कसं हसू फुलवावं हे मला तुम्हीच शिकवता बाबा।
ॐ साई राम

साई बाबा म्हणतात ,
असा विचार करू नका
स्वप्न का पूर्ण होत नाही, साहसी
कधी अपूर्ण नाही,
ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,
त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही
ॐ साई राम

रागाला संयमानं घेण्याची शिकवण म्हणजे साई
दुःखात ही हसता येतं हे दाखवतात माझे साई
जय साई राम

साऱ्या जगामध्ये घुमतयं,
म्हणूनच तर काल जन्माला आलेलं
पोरगं सुद्धा ॐ साई राम म्हणतय..
शुभ सकाळ

कधीही कुणात करायचं नाही भेद इथे असतात सगळे एक
साईबाबांचा हाच जीवनमंत्र की “सबका मालिक एक।
ॐ साई राम

पालखी” कधीही थांबत नाहीत,
“साईराम” कधी थकत नाहीत।
“शिर्डीवाले साई” ची आमची वेड आहे,
कोणासमोर नमन करत नाही।
ॐ साई राम

तुझ्या शिर्डीत येण्यासाठी अडवत नाहीत
माझ्या आयुष्यातील कूरबूरी।
खरंच बाबा शिर्डीत येऊन तुझ्या मुर्ती कडे बघितलं
तर कळतं कशाला म्हणता श्रद्धा आणि सबुरी।
ॐ साई राम

कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन।
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन।
ॐ साई राम

सगळं ऐश्वर्य झुकतं कसं बघावं माणसानं,
अखंड ब्रह्मांडाचा बाबा फकीर होऊन फिरतो गावागावांनं,
मनाचा गाभा म्हणजेच माझे साईबाबा।
ॐ साई राम

प्रेम तर सगळेच करतात
पण जिच्याकडून ममता मिळते तिला
“आई“ म्हणतात,
तेलाने तर सगळेच दिवे लावतात.
पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला
“साई” म्हणतात।

जेव्हा या थकलेल्या डोळ्यासमोर शिर्डी हे स्थळ येतं,
तेव्हा या आयुष्यातून हरलेल्यालाही जगण्याचं बळ येतं
उर्जा आणि शक्ती फक्त साईबाबा आणि माझी भक्ती।
ॐ साई राम

तुच रे‪ ‎साई सावरशील मजला,
तुच दाखवशील‪ ‎वाट,
तुझ्यामुळेच आमुचे‪ कौतुक,
तुझ्यामुळेच रे माझी शान
म्हणूनच लोक येता जाता म्हणतात।
ॐ साई राम

मी नदी आहे एक दिवस समुद्रही होईल,
साई तु सोबत रहा म्हणजे माझ्या जगण्याची होडी मोक्षाला जाईल,
ॐ साई राम।

ऐसा येई बा, साई दिगंबरा
अक्षयरुप अवतारा,
सर्वही व्यापक तू श्रुतीसारा
अनुसया त्रिकुमारा,
ऐसा येई बा साई दिगंबरा, साई दिगंबरा।
ॐ साई राम

मनात साईनाथ तुमचाच वास,
माझ्या प्रत्येक प्रवासात तुमचा सहवास,
अनाथांचे नाथ साईनाथ।

सकाळ हसरी असावी
साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी
मुखी असावे साईचे नाम
सोपे होई सर्व काम
ॐ साई राम

हा क्षण असाच थांबून रहावा
साई तुझा सहवास मला असाच लाभावा
!! ॐ साई राम !!

कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन
ॐ साई राम

बाबांच्या सोबतीने माझ्या जगण्यात नवा रंग यावा
साई माझं जगणं तुमच्या चरणाशी येऊन जगण्याचा अर्थ सार्थ व्हावा
!! ॐ साई राम !!

शुभ सकाळ ૐ साँईं राम
साँईं म्हणतात, क्षणात अमीर आहे,
क्षणात फकीर आहे, चांगले कर्म
करुन घे, हेच तर नशीब आहे।

जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं
तेव्हा मन साई तुमच्या चरणांकडं धावायला लागतं
ओम साई राम

झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी
ॐ श्री साईनाथाय नमः

या मनाचा एकचं आसरा
जेव्हा खचल्यासारखं वाटेल तेव्हा आठवा साईचा चेहरा
माझं ऊर्जा स्थान साईबाबा
बाबांना तुम्ही स्वतः आपले समजा
साईबाबा तुम्हाला सर्वस्व समजेल
तुमच्यासारखा मार्गदर्शक लाभला तर बाबा अंधारातही नवा सूर्य निघेल
!! ॐ साई राम !!

साई बाबा कोट्स इन मराठी वाचून जर तुमचं मन साई भक्तीने भारले असेल, तर तुम्ही “sai baba vachan”, “sai baba story” आणि “sai baba 108 names” सारखे लेखही नक्की वाचा। हे सर्व लेख तुम्हाला साईंच्या शिकवणुकीचं गूढ अधिक खोलवर समजावून सांगतील. साईंची कृपा आणि त्यांचे विचार आयुष्याला नवा प्रकाश देतात. साई बाबा कोट्स इन मराठी हे विचार वाचल्यावर भक्त भावनिकदृष्ट्या अधिक जोडले जातात.

Share

Leave a comment